सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे/प्रशांत पोतदार) 🔷🔶🔷🔶
पेण शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे त्यामुळे पेण शहरात वाहतुकी समस्या निर्माण होत असल्याने अवैध्य रितिने शहरात वाहन पार्किंग विरोधात (आज) बुधवार रोजी सकाळी वाहतुक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली.
पेण शहरात खरेदि साठी येणाऱ्या वाहन चालकांकडून रस्त्यावर अवैध्य रितीने वाहन उभी केली जात असल्याने रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. तसेच रस्त्यात पार्क केलेल्या दोन चाकी तसेच चार चाकी वाहनांमुळे वाहतुक कोंडी होत असल्याने वाहतुक पोलिसांकडून अश्या वाहतुकिचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाइन कारवाई करुन दंड आकारण्यात येत आहे.
त्यामुळे बैशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत. वाहुतुक पोलीस शाखेतील रविराज बारकुल,देसाई, थळे,कवळे,कोळी,गेंड,धायगुडे पथकाने कारवाई केली.







Be First to Comment