सिटी बेल लाइव्ह / उरण(घनःश्याम कडू) 🔶🔷🔶🔷
राज्यात गेले 5 ते 6 महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वच लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामध्ये शिथिलता येत काही व्यवसाय उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र रेस्टॉरंट व बार उघडण्यास शासनाची बंदी असतानाही या आदेशाची पायमल्ली करून उरण शहरात सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू ठेवल्या प्रकरणी उरण पोलिसांनी मालक अशोक महाबल शेट्टी यांच्यावर 363/2020 भांदवी कलम 188, 269, सह. म. पो. का. कलम 37(1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई होऊनही बार सुरुच असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर इतर व्यवसाया बरोबर ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ते व्यवसाय सुरू करण्यास मनाई आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट व बारचाही समावेश आहे. वीर सावरकर मैदाना समोरील अशोक शेट्टी यांच्या मालकीचा सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू असल्याची खबर उरण पोलिसांना लागताच त्यांनी बारवर धाड टाकली असता त्यांना रेस्टॉरंट व बार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
सदर ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याने दिसून आले. या प्रकरणी सह्याद्री रेस्टॉरंट व बारचे मालक अशोक शेट्टी यांच्यावर 363/2020 भांदवी कलम 188, 269, सह. म. पो. का. कलम 371(1) (37) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी जगदीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपो निरी. पवार हे करीत आहेत.
Be First to Comment