पुढील दहा दिवस संचार बंदी करा : नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी ###
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली ###
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून लाॅकडाऊन चा त्यावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळे पुढील दहा दिवस संचारबंदी जाहीर करा अशी मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
रविंद्र भगत यांनी दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोग वाढता पाहता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३ जुलै २०२० रोजी लॉक डाऊन करण्यात आला परंतु त्याचा फारसा परिणाम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झाला नाही. नागरिक ही कोणत्या कोणत्या कारणाने सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर येतच आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत.त्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या चार पटीने वाढत आहे.
आजची परिस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीत दिसत आहे.तरी परिस्थिती सुधारली नाही तर पनवेल महानगरपालिका ही व्हेंटिलेटरवर आहे अशी परिस्थिती नागरिक करत आहे. पुढील दिवसात परिस्थिती जास्त निर्माण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून संचारबंदी लागू केली तर नक्कीच याच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
या उद्देशाने आपणांस नम्र विनंती करतो . या विषयीचे गांभीर्य तात्काळ घेऊन पुढील १० दिवस पनवेल महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात यावी.






Be First to Comment