वाढत्या रुग्ण संख्येने कळंबोलीकर चिंतेत ###
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ###
कळंबोली शहरात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने कळंबोलीकरांची झोप उडाली आहे. या शहरातील मु्त्यू दर अन्य शहरांच्या प्रमाणात जास्त असून १७ जणांचा बळी गेला. लाँकडाऊन कालात 30 कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने मोठा चिंतेचा विषय आहे. कोरोनाला नियंत्रणात आणायचे असेल तर येथील सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधीनी जनजागृती करणे आवश्यक आहे.
कळंबोली शहरात १० जुलै पर्यंत ५९९ जण कोरना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील ३४९ जण बरे झाले आहेत. २३२ जणांवर उपचार चालू असून १८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना साथीच्या रोगाला कळंबोलीकर जनता गांभीर्याने घेत नसल्याने कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यासाठी सामाजिक संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून कोरोना विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर जनतेच्या सहकार्य महत्वाचे आहे. कळंबोली शहरासाठी १६ नगरसेवक आहेत. आपापल्या प्रभागासाठी नगरसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करताना जनतेला गर्दीची ठिकाणे टाळण्यास व आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे यावर जास्त भर देवून मास्क लावणे बंधनकारक, सोशल डिस्टंनसिंगचे काटेकोर पालन करावे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे न सँनेटाझर करणे नियमांचा नागरिकांच्या मनावर प्रभाव टाकला तर आणि तरच कोरोनावर मात करू शकतो.
महानगरपालिकेनेही कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना कार्यरत केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनही मोठे सहकार्य मिळू शकते पण कळंबोली शहरातील दोन-तीन नगरसेवक सोडले तर बाकींचा वनवा आहे. हरवलेल्या नगरसेवकांना कळंबोलीमधील जनता शोधत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने पुन्हा ४ जुलै ते १३ जुलै पर्यंत कडक लाँकडाऊन घोषित केला आहे पण लोकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कळंबोली शहरात कोरोनाने थैमान चालूच आहे. करोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसून येते






Be First to Comment