सिटी बेल लाइव्ह / रोहा / समीर बामुगडे 🔷🔶🔶🔷
रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे उंबराचा पाणी नावाचे जंगल भागात रोहा तांबडी रोड लगत मोरी जवळ दिनांक 26 /9 /2018 रोजी रात्री साडेसात ते दिनांक 27/ 9/ 2018 रोजी चे पहाटे दीड चे दरम्यान ही घटना घडली होती .
सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील आरोपी एक सतीश उर्फ बाबा संजय गोरे व आरोपी दोन सुनील अंकुश कांबळे यांनी संगनमत करून फिर्यादी संदीप गोपाळ मोरे वय 43 रा. रोठखुर्द वाघेश्वर नगर जे .एम. राठी हायस्कूल समोर तालुका रोहा जिल्हा रायगड यांचा मुलगा कु. जागृत संदीप मोरे वय 18 यांचे तोंडावर व चेहऱ्यावर कोणत्यातरी हत्याराने एक गंभीर दुखापती करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रोहा तांबडी रोड लगत असलेल्या मोरीचे पाईप मध्ये लपवून ठेवला.
सदर गुन्हा फिर्यादी याने रोहा पोलीस ठाणे येथे ते दाखल केला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक सतीश उर्फ बाबा संजय मोरे ,आरोपी क्रमांक दोन सुनील अंकुश कांबळे या आरोपींना रोहा पोलीस ठाणे यांनी जेलबंद केले .
या गुन्ह्याचा तपास श्री.जे.आय. मुल्ला पोलीस निरीक्षक रोहा पोलीस ठाणे यांनी केला. आरोपी क्रमांक एक सतीश उर्फ बाबा संजय मोरे व आरोपी क्रमांक दोन सुनील अंकुश कांबळे यास कलम 302/ 397/ 201 /411/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला उपरोक्त नमूद आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी मा.जलदगती न्यायालय माणगाव येथे झाली .गुन्ह्याचे कामी अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील श्री, जितेंद्र द. म्हात्रे यांनी काम पाहिले. तसेच सदर काम करत असताना अधिकारी श्री . शशिकांत कासार ,श्री. आत्माराम पाटील पोह./1234, रोहा पोलीस ठाणे .सदर केस मध्ये श्री .जितेंद्र म्हात्रे यांनी माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिर्णय दाखल करून प्रभावीपणे युक्तिवाद केला माननीय टी. एम .जहागीरदार अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव रायगड यांनी सदर प्रकरणात सर्व आरोपींना दिनांक 14/ 9 /2020 रोजी दोषी धरून भा.द.वि.कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड, भा.द.वि.कलम 397 अन्वये सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व भा.द.वि.कलम 201 अन्वये तीन वर्ष शिक्षा व प्रत्येकी दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. जितेंद्र म्हात्रे यांनी सदरच्या निकालाची माहिती दिली .
Be First to Comment