Press "Enter" to skip to content

कोट्यावधींचे रक्तचंदन जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷


गोट फार्म हाऊसच्या नावाखाली रक्तचंदन तस्करीचा सुरू असलेला धंदा
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगङ मुळे उघङकिस आला असून 1 कोटी 87 लाख पन्नास हजाराचे रक्तचंदन आणि 62 हजार रूपयाची यंञसामुग्री कर्जत तालुक्यातील नारळवाङी कळंब येथून जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रक्तचंदनाची किंमत दहा कोटीच्या घरात आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या फार्महाऊसवर गोट फार्मच्या नावाखाली रक्तचंदन तस्करीची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागली होती.रायगङचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फार्महाऊसची रेकी करून खाञी करण्यात आली.

त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सचीन निकाळजे, पोलीस नाईक सुभाष पाटील, सागर शेवते, भानूदास कराळे, विशाल आवळे, पोलीस शिपाई संदीप चव्हाण व चालक पोलीस शिपाई अनिल मोरे यांच्या पथकाने व वन विभागाचे वनपाल ए.बी.घुगे व त्यांच्या पथकाच्या मदतीने फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला.त्यावेळी गोट फार्म मधील मोकळया जागेमध्ये साधारण 22 मीटर लांबीचा, 02 मीटर रूंदीचा व दिड मीटर खोलीचा सिमेंट काँक्रीटचा भला मोठा खड्डा तयार केला होता. त्या संपूर्ण खड्डयावर लोखंडी अॅंगल टाकून फरशी टाकून त्यावर पुन्हा माती अंथरली होती. त्यामुळे या खड्डयावर जंगली गवत उगवले होते आणि त्या खडड्यामध्ये ‘रक्तचंदन’ या संरक्षीत वृक्षाच्या लाकडाचे भले मोठे ओंडके लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

तसेच नमूद फार्म हाउसमध्ये एक दुमजली बिल्डींग असून त्या बिल्डींगमधील खोल्यांमध्ये 14 इंची इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक करवत व इतर अवजारांच्या मदतीने त्या लाकडाचे ओंडके कापून, त्यावरील साल काढून ते व्यवस्थित पॅक करून तस्करीकरिता पुढे पाठविले जात असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी फार्म हाऊचा मालक व आणखी दोघाना अटक करण्यात आली आहे.

रक्तचंदन’ या संरक्षीत वृक्षाची लाकडे जप्त केली असून या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर 100/2020, भादविसं कलम 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, महाराष्ट्र वन नियम सन 2014 चे नियम 31,47,53,82 व 82(2) व मुंबई वन अधिनियम सन 1942 चे कलम 66, 82, 129 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.