
पाटणसई ग्रामपंचायतीकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप : आशा सेविकांनाही आर्थिक मदत ###
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : ###
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठण्याजवळील पाटणसई (ता.रोहा) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत उत्पन्नातुन आदिवासींसाठी असलेल्या १५ टक्के अनुदानातून ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाटणसई व चिकणी आदिवासी वाडी व पाटणसई बौध्दवाडी मधील ग्रामस्थांना सार्वजनिक स्वरूपात सतरंजी व प्लास्टिक खुर्च्यांचे वाटप करण्यात आले.
याशिवाय कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुचिता राणे, जयश्री जोशी, रोशनी वाजे, कृष्णी हंबीर या आशा सेविकांना यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ, श्रीफळ व आर्थिक मदत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटणसई ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटपही यावेळी करण्यात आले.
पाटणसई ग्रामपंचायतीच्या कै. देविदास गणपत गणपत गायकर सभागृहात रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते सदानंद गायकर, पाटणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. माधवी सदानंद गायकर, उपसरपंच लिंबाजी पिंगळा यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पाटणसईचे माजी उपसरपंच व राष्ट्वादी काँग्रेसचे कार्यकर्ते पांडुरंग गायकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर गायकर, पाटणसई ग्रा.पं. सदस्य सुरेश गायकर, सचिन कळसकर, दीपक महाडिक, ऐश्वर्या अशोक कोतवाल, खेळीबाई सहदेव कोतवाल, मीना हेमंत दरवडा, ज्योती राम बोडेकर, बेबी नारायण शिंगवा, सौ. सखूबाई पिंगळा, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.






Be First to Comment