Press "Enter" to skip to content

धक्कादायक : अलगीकरण कक्षात सुरक्षा रक्षकाचा महिलेवर बलात्कार

20 वर्षीय विवाहित महिला गर्भवती राहील्याने प्रकरण उघडकीस 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / मीरारोड 🔶🔷🔶🔷

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अलगीकरण कक्षात एका २० वर्षीय विवाहितेवर पालिकेच्या ठेक्यावरील काम करणाऱ्या सैनिक सिक्युरिटीच्या सुरक्षा रक्षकाने सतत तीन दिवस बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे . या घटनेने खळबळ उडाली असून वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती .

पीडिता हि मीरारोड परिसरात राहणारी असून तिला ७ महिन्याची मुलगी आहे . तिच्या घरातील आत्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पिडीतेसह घरातील सदस्यांना २४ मे रोजी महापालिकेच्या भाईंदर पूर्व येथील स्व . गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलासमोरील अलगीकरण कक्षात दाखल केले होते .

सदर इमारतीत लहान सदनिका असल्याने प्रत्येकास स्वतंत्र सदनिकेत ठेवले जाते .

या ठिकाणी पालिकेचा ठेकेदार सैनिक सिक्युरिटीचा सुरक्षा रक्षक विक्रम बाबूसिंग शेरे ( २७ ) रा . गुजराती चाळ , मोती नगर , भाईंदर ( पश्चिम ) याने लहान मुलीला दुध व गरम पाणी देण्याच्या बहाण्याने पिडीतेशी ओळख केली . फिर्यादी नुसार विक्रम याने २, ३ व ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास पीडितेला ठेवलेल्या १०७ क्रमांकाच्या सदनिकेत जाऊन तिला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध केले . कुठे वाच्यता केल्यास मुलीला ठार मारेन अशी धमकी आरोपीने दिली .

५ जून रोजी पीडितेला दुसरीकडे हलवण्यात आले . बरी होऊन ती घरी परतली . परंतु ऑगस्टमध्ये तिला गर्भ राहिल्याचे लक्षात आले . घरात तिच्या नवऱ्याला हा प्रकार समजल्या नंतर त्याने तिला सोडचिठ्ठी दिली . पीडितेने भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर शनिवारी रात्री विक्रम विरुद्ध बलात्कार सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे . आरोपी विक्रम देखील विवाहित असून त्याला दोन मुली आहेत असे सूत्रांनी सांगितले .

पोलिस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक निरीक्षक साहेबराव पोटे हे पुढील तपास करत आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.