लहान मुले, पालक आणि शिक्षक ह्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण ? ###
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ###
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतू पनवेल परिसरातील शाळेकडून या नियमाला बगल देत विद्यार्थ्याना शाळेत बोलवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहे. पनवेल महापालीका शाळा क्र. २ हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती.या कोरोना संसर्ग काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. या संदर्भात शिवसेना मा. नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी त्या शाळेत जाऊन प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
पनवेल महापालीका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेनदिवस वाढ होत आहे. पनवेल परिसर रेड झोन आहे. दररोज कोरोना बाधित रुग्नांचा आकडा शंभरीच्या पुढे आहे.या अनुशंगाने पनवेल मनपा परिसरातील तसेच जि. प .शाळा अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यासाठी शासन द्विधावस्थेत आहे. कोरोनाच्या काळात विद्यर्थ्यांना शाळेत येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तरी सुध्दा पनवेल परिसरातील शाळेकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. पनवेल महापालिका क्र. शाळा २ हुतात्मा हिवरे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत सातवी वर्गातील विद्यार्थ्याना गणवेश परिधान करुन पुस्तके घेण्यास बोलवण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकाचे वितरण केले जाते. ही पुस्तके घेण्याकरीता पालक तसेच विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. सॅनिटायझरचाही उपयोग करण्यात आलेला नाही. या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्याना बोलवलेच कसे असा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे. या संदर्भातशिवसेना मा. नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनीप्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून कोणत्या आधारावर पुस्तके वाटण्यात आली याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
पनवेल महानगरपालिकेने लॉकडाऊन केला आहे. अगदी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने ही बंद आहेत. नागरिकांवर कारवाया चालू आहेत. पण महापालिकेच्या शाळेतल्या मुलांना शालेय वर्षातील नवीन पुस्तके वाटण्यासाठी पालकांना आणि मुलांना जबरदस्ती शाळेत बोलावून गर्दी करून ही पुस्तकं वाटण्याचा घाट घातला. का तर शासनाला अहवाल पाठवायचा म्हणून. कोणतही नियोजन नाही. सॅनिटायझेशन ची व्यवस्था नाही, सोशल डिस्टनसिंग नाही. आता या अविचारी निर्णयामुळे लहान मुले, पालक आणि शिक्षक ह्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? या बाबत आज शहरात संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवला आहे. – शिवसेना मा. नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण
आम्ही शासनाच्या नियमानुसार पुस्तक वाटत असून मात्र या साठी पालकांना बोलवण्यात आले असता त्याचा सोबत त्यांचे शाळेत शिकणारे विद्यार्थीही आले. – प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब चिंमणे






Be First to Comment