सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे) ###
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संसर्ग हा जागतिक साथीचे आजार घोषित केल्याने कोरोना महामारीच्या संकटामध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन पाळले होते. एक – दोन महिन्यांनी लॉक डाऊन टप्या टप्प्याने शिथिल केले असून कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूीवर यावर्षी एक दीड महिन्याच्या अंतराने काही दिवसांवर आलेले सार्वजनिक सण उत्सवां वर कोरोनाचे सावट पसरले असून यावर्षी उत्सवांचा आनंद मिळणार की नाही,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यातील दैनंदिन व्यवहार भात शेती ची कामांना वेग आला आहे काही ठिकाणी आषाढ महिना संपण्याच्या आणि श्रावण महिना सुरू होण्याच्या दरम्यान भात शेती ची लावणी चे काम अंतिम टप्प्यात आली असून पावसाळी दिवस हे विविध सणावारांचे असतात,व्रत – वैकल्याचे, उपवासांची रेलचेल श्रावणी सोमवार,शनिवार, मंगला गौर, तर श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी,गोकुळाष्टमी, गणेशोत्सव हे सार्वजनिक सण गावोगावी मोठ्या उत्साहाने साजरे होतात..या वर्षी २५ जुलै रोजी नागपंचमी,३ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा ( रक्षा बंधन),११ ऑगस्ट रोजी गोपाळकाला( दही हंडी) व २२ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी हे सण आहेत. कोरोना साथीमुळे,मार्च महिन्या पासून लॉक डाऊन मुळे सदर कालावधीतील श्री राम जन्मोत्सव, पालखी जत्रोत्सव,लग्नादी,कार्यक्रम रद्द करण्यात आले होते,त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली होती. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापुढील काळात लॉक डाऊन अंशतःउठले ,तरी महिना – दिड महिन्यांच्या अंतरावर आलेल्या सार्वजनिक सण साजरे करण्यावर मर्यादा येतील,त्यामुळे कोकणात फार मोठ्या उत्साहात साजरे होणारे गोपाळकाला व गणेशोत्सव सणांवर विघ्न येऊ नये,म्हणून विघ्न हर्त्या गणरायाला प्रार्थना करीत आहेत..
चौकटी मध्ये..
जोपर्यंत कोरोना वर प्रभावी लस,औषधोपचार सापडत नाहीत तोपर्यंत सण,दैनंदिन जीवन पूर्वपदावर येणार नाही.त्यामुळे कोरोना लसीचे लवकरात लवकर परीक्षण व्हावे यासाठी ही सर्वसामान्य आशा लावून आहेत मात्र पुढील महिन्याभरात कोरोना वरील लस सापडली नाही, तर गोपाळकाला व गणेशोत्सवावर यांसारख्या सार्वजनिक सण समारंभांवर परिणाम होऊन विवाह व जत्रोत्सव प्रमाणेच कोरोना चे सावट पसरणार आहे..






Be First to Comment