Press "Enter" to skip to content

सरस्वती म्हस्के यांचे दु:खद निधन


सिटी बेल लाइव्ह /खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) ###


रोहे तालुक्यातील मुठवली बु.गावच्या रहिवासी असणाऱ्या सरस्वती गंगाराम म्हस्के यांचे शुक्र. दि.१० जुलै रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.म्रुत्यूसमयी त्या ७५ वर्षांच्या होत्या.
सरस्वती म्हस्के या अतिशय प्रेमळ,शांत स्वभावाच्या होत्या.तसेच सर्वांशी आपुलकीने वागायच्या.सध्या कोरोना व्हाईरसने जगभर थैमान माजविले असल्याने सामाजिक सुरक्षिततेचे द्रुष्टीने सरस्वती म्हस्के यांच्या अंत्यविधीसाठी म्हस्के परिवारातील सदस्य,आप्तस्वकीय व मुठवली ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करन अंत्यविधी यथायोग्य पद्धतीने पार पाडला.
सरस्वती म्हस्के यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी रविवार दि.१९ जुलै तर अंतिम धार्मिकविधी बुध.दि.२२ जुलै रोजी मुठवली येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.