Press "Enter" to skip to content

गायनीचीवाडी आदिवासी वाडीतील दिवे सौरऊर्जा प्रकल्पाने उजाळाले

आदिवासी बांधव अंधारातून प्रकाशाकडे : पालकमंत्री आदिती तटकरे यांचे सहकार्य

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ###

नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायनीचीवाडी येथील दहा कुटुंबियांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. त्यामुळे गायनीचीवाडी या आदिवासी वाडीतील गरीब आदिवासी बांधवांच्या घरातील दिवे सौरउर्जा प्रकाशाने उजाळाले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनिल तटकरे, कोकणचे आमदार अनिकेत तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रायगड जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हा सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

गायनाचीवाडी येथील तुळशीराम मेंगाळ, रामी पिंगळा, रमेश शिंगवा, दामा पिंगळा, दामा मेंगाळ, दुर्ग्या शिंगवा, सांगू शिंगवा, नवश्या पिंगळा, कांत्या पिंगळा, मालू पारधी आदी दहा आदिवासी कुटुंबियांसाठी सौरउर्जेवर चालणारे घरगुती लाईटची व्यवस्था करून प्रत्येक कुटुंबियांना एक पंखा, पाच ट्यूब व एक बॅटरी इत्यादी वस्तू वाटप करण्यात आले आहे.

दरम्यान कडसुरे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना अंधारातून प्रकशात आणण्याचे महत्वपूर्ण व मौलिक काम केल्याबद्दल सरपंच राजेंद्र शिंदे यांनी खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांचे ऋण व्यक्त करून आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.