आरोपीच्या बहिणीनीनेचं दिली पोलिसांना माहिती 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / वचन गायकवाड / पनवेल 🔶🔷🔶🔷
विचुंबे येथे ज्ञानेश्वर माऊली सोसायटी विंग एम.11 मध्ये सुय॔कांत जाधव व त्याची पत्नी सारथी जाधव हे दोघे राहत होते. या दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत असल्याची तेथील लोकांनी माहीती दिली. सातत्याने होणार्या भांडणाला कंटाळून अखेर आरोपी सुय॔कांत जाधव वय 36 यांने दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारच्या 1 ते 2 वाजताच्या दरम्यान आपल्या (मयत सारथी जाधव वय 26) बायकोचा गळा दाबून हत्या केली.
आरोपी पळून न जाता स्वताहून घटनास्थळी हजर होता. आरोपीच्या बहिणीनीनेचं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. खांदेश्वर पोलिसाना या संबंधीची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले.
आरोपीला घटनास्थळीच अटक करण्यात आली. खांदेश्वर पोलिस ठाण्यात आरोपीवर भादवी कलम 302 हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला आज दिनांक 9सप्टेंबर रोजी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कस्टडी दिली असल्याची माहाती पी.एस.आय. नंदकुमार सावंत यांनी दिली. सदर पुढील तपास खांदेश्वर पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. नंदकुमार सावंत करीत आहे.






Be First to Comment