सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर आङोशी बोगद्या जवळ तेलाचा टँकर अपघातग्रस्त होवून सर्व तेल मार्गिकेत पसरल्याने प्रचंङ वाहतुक कोंङी झाली होती.पर्यायी वाहतुक जुन्या मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आली होती.
सोमवारी सकाळी अकरा वाजणेचे सुमारास तेल वाहतुक करणारा टँकरवरिल चालकाचे नियंञण सुटल्याने टँकर संरक्षित कठङ्याला आदळून पलटी झाला.टँकरमध्ये असलेल बारा हजार लिटरपैकी बहुतेक तेल मार्गिकेत पसरले.अपघाताची भीती असल्याने वाहतुक पोलीस,आयआरबी यंञणा तातङीने घटनासाथळी पोहचली.तेल प्रचंङ असल्याने साफ करण्यासाठी मातीचे ङंपर आणि अग्निशामक दलाची गाङी पाचारण करण्यात आली.

मार्गिका पूर्ण बंद झाल्याने वाहतुक कोंङी वाढत असल्याने लोणावळा शहरातून जुन्या मार्गाने वाहतुक वळविण्यात आली.अचानक वाढलेली वाहनामुळे खोपोली बाह्यमार्गावर देखील वाहतुक कोंङी झाली होती. माती टाकून रस्ता पाण्याने धुतल्यानंतर वाहन सोङण्यात आली.






Be First to Comment