Press "Enter" to skip to content

जनसेवेसाठी वाहून घेतलेले खा. सुनील तटकरे म्हणजे जाणता राजा : शिवरामभाऊ शिंदे

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : ###

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नंतर राज्य मंत्री मंडळात वीस वर्षे विविध खात्यांचे मंत्री आणि आत्ता खासदार म्हणून अशी गेली ३५ वर्षे तटकरे साहेबांनी लोकांची सेवा करून स्वताला जनसेवेसाठी वाहून घेतले. राजकारण करतांना केवळ विकासाचे लक्ष समोर ठेऊन त्यांनी काम केले. आत्ता साहेबांची मुलगी ना. आदितीताई मंत्री म्हणून व मुलगा अनिकेतभाई आमदार म्हणून कौतुकास्पद कार्य करीत आहेत आणि महत्वाचे म्हणजे सर्व जनता साहेबांच्या सोबत असल्याने जनसेवेसाठी स्वताला वाहून घेतलेले खासदार सुनील तटकरे साहेब म्हणजे जाणता राजा आहेत असे गौरोद्गार पेण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व नागोठणे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे यांनी काढले.

खासदार सुनील तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असतांनाच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खारीचा वाटा म्हणून आपणही काहीतरी समाजोपयोगी कार्य करावे या उद्देशाने पळस ग्रामपंचायतीकडून आयोजित केलेल्या कोविड योद्धांचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. शिवरामभाऊ शिंदे यांच्यासह यावेळी पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य हिराजी शिंदे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य तुकाराम कदम, चंद्रकांत भालेकर, मारुती शिर्के, लहू वाघमारे, सचिन जोशी, परशुराम शिर्के, राजेश शेलार, संतोष भालेकर, ग्रामसेविका कांचन राऊत आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या पळस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ. कांचन चंद्रकांत राऊत, पळसचे पोलीस पाटील बबन शिंदे, पळस आंगणवाडी सेविका सौ. मंजुळा तुकाराम शिर्के, शेतपळस आंगणवाडी सेविका सौ. अनुराधा प्रकाश चंदने, आशा सेविका सौ. विजया मोरेश्वर भालेकर, सौ. मनीषा अशोक डाकी, वायरमन नरेंद्र साकपाले, निलेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, आंगणवाडी मदतनीस आदींचा यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांच्या सहीचे सन्मान पत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. तटकरे साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी श्री पळसाई मातेच्या चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिराच्या प्रांगणात व गावात येणाऱ्या रस्त्यालगत नारळाच्या झाडांचे वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.