पोलीस प्रशासनाने कोंबडी चोरांना पकडण्याची शेतकऱ्यांची मागणी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 💠🌟💠
कर्जत तालुक्यातील कडाव मध्ये कोंबडी चोरांचा सुळसुळाट, पोलीस प्रशासनाने कोंबडी चोरांना पकडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक कर्जबाजारी शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत तर काही शेतकरी वडिलोपार्जित शेती टिकविण्यासाठी आपल्या शेतात राबराब राबुन शेती पिकवित आहेत. परंतु, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणुन शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत.
जेणेकरून कुटुंबातील लहान मुलांचा तसेच थोरामोठ्यांचा उदरनिर्वाह होईल. परंतु, शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या देखील रात्रीच्या वेळेस कोंबडी चोर मंडळी सराईतपणे चोरुन नेत आहेत. त्यामुळे आधीच देशोधडीला लागलेला व देशात कोरोना सारख्या महामारीने चिंतातुर झालेला गरीब शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
नुकतेच कडाव गावातील शेतकरी तथा माजी सरपंच फुलाजी पवार व पांडुरंग दळवी ह्या शेतक-यांच्या मागील आठ दिवसात सुमारे शंभर ते दीडशे कोंबड्या कोंबडी चोरांनी फस्त केल्या.
चोरीस गेलेल्या कोंबड्यांबाबत त्यांनी कडाव गावचे पोलिस पाटील रमेश दामु पवाळी ह्यांच्याही निदर्शनास आणुन देऊन चोरीस गेलेल्या कोंबड्यांबाबत कर्जत पोलिस ठाणे येथेही लेखी तक्रार अर्ज केला असुन कर्जत पोलिसांना कडाव गावातील कोंबडी चोरांना पकडण्यास अद्यापी यश आलेले नाही.
तरी, चोरीस गेलेल्या कोंबड्यांमुळे भयभीत व आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कोंबडी चोरांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Be First to Comment