आज नव्याने 11 कोरोनाबाधित तर मोहोपाड्यातील नामांकित डाॅक्टर कोरोनामुक्त ###
सिटी बेल लाइव्ह / रसायनी / राकेश खराडे ###
संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होवून वासांबे मोहोपाडा परिसरातील नागरिकांचे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले.यातच नागरीकही आपापल्या परीने आपली व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दुर राहून प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. आता कोरोना महामारीच संकट वासांबे मोहोपाडा परिसरातील नागरिकांच्या मानगुटीवरच येऊन बसला आहे.वासांबे मोहोपाडा कोरोनाचे हाॅटस्पाॅट होवू पाहतोय.
कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुणीही सांगु शकणार नाही अशी सत्य व गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून वासांबे मोहोपाडा मधील वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख पाहता आता नागरीकांमध्येही कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे.
त्यातच पावसाळा सुरु झाल्यामुळे रसायनी परिसराने जणु हिरवा शालुच परिधान केला आहे.
असे मनमोहक दृश्य जरी परिसरात दिसत असले तरी,परिसरात कोरोनाचे संकट गडद झाले आहे. नागरिकांची बाहेर पडण्याची जणू वाटच पाहत आहे.
वासांबे मोहोपाडा परिसरातील जनतेने सागरी वादळावर मात करून आता विषारी व जंगली श्वापदे ,कोरोनाचे संकट मानगुटिवर बसु पाहत आहे. कोरोनावर मात करून वासांबे मधून कोरोना हद्दपार करण्याची वेळ समस्त रसायनी परिसरातील जनसमुदयावर आलेली आहे.
आज वासांबे मोहोपाडा हद्दित शनिवारी नविन अकरा कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून वासांबे मोहोपाडा हद्दित एकूण कोरोना रुग्ण संख्या 105 झाली आहे.तर मोहोपाडा येथील एका नामांकित डाॅक्टरने कोरोनावर मात केली आहे.शनिवार दि.11 जुलै रोजी रिस बालाजी गार्डंन चार,रिस नविन वसाहत तीन, नविन पोसरी तीन,तलेगाव एक असे अकरा जण सापडले आहेत.तर बरे होऊन डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तीची संख्या 26 झाली आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दितील जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे .






Be First to Comment