सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
कर्जत तालुका गट शिक्षणाधिकारीपदी संतोष दौंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षे कर्जत तालुक्यातील महत्वाचे असलेले गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते, सुरेश डंबाये हे निवृत्त झाल्या नंतर अनेक जणांनी प्रभारी म्हणून काम पाहिले, गेले वर्षभर सहायक गटविकास अधिकारी सी. एस. रजपूत यांचेकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता,तेव्हा पासून हे पद रिक्तच होते .
संतोष दौंड यांनी शिक्षक म्हणून 2003 पासून कर्जत तालुक्यातील बार्डी येथून आपल्या सेवेची सुरुवात केली व आपल्या कामाने शाळा नावारूपास आणली येथे सात वर्षे सेवा देऊन कर्जत माणगाव येथील शाळेत पाच वर्षांचा सेवा काळ पूर्ण केला आहे.
अभ्यासू, शांत व संयमी व्यक्तिमत्त्व असलेल्या संतोष दौंड यांना 2014 ला पंचायत समिती ने आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला होता, स्पर्धा परीक्षेत विशेष रुची असणारे दौंड यांचे गणितावर विशेष प्रभुत्व आहे, त्यांनी 2017 ला एम, पी, एस, सी ची परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळवून ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल येथे गेली अडीच वर्षे कार्यरत होते.
या काळात पूर्ण जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या निमित्ताने त्यानी सर्व शाळांना भेटी देऊन, आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. त्यांची पी, एच, डी पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्याच्या रूपाने विदयार्थी व शिक्षक हिताचा विचार होईल कारण त्यानी स्वतः शिक्षक म्हणून काम केले असल्याने शिक्षकांचे प्रश्न जवळून अनुभवले आहेत, तरुण व धडाडीचे अधिकारी असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा शिक्षण विभागला होईल,त्यांच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
—————— प्रतिक्रिया- —————-
कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून काम केले आहे व त्याच ठिकाणी अधिकारी म्हणून काम करतांना विदयार्थी व शिक्षक हिताला प्राधान्य देऊन, कर्जत तालुक्याचा नावलौकिक उंचावून गुणवत्ता वाढ करण्यावर विशेष भर राहील.
संतोष दौंड (गटशिक्षणाधिकारी कर्जत तालुका)







Be First to Comment