सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)-
कोविड १९ आजाराचे रुग्ण दिवसागणिक पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात हि वाढत आहेत ,आजमितीस दिवासाला दीडशे ते दोनशे रुग्ण पनवेल महापालिका क्षेत्र ,ग्रामीण क्षेत्रात आढळत आहेत. या रुग्णांना उपचारार्थ असलेले कोविड समर्पित रुग्णालये कमी पडत आहेत. याकरिता सिडको महामंडळाने ज्याप्रमाणे मुलुंड येथे कोविड १९ समर्पित रुग्णालय सुरु केले आहे. त्याचप्रमाणे पनवेल ,उरण ,नवीमुंबई भागात अद्ययावत रुग्णालय सुरु करावे अशी मागणी जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याकडे निवेदनाचा इमेल पाठवून केली आहे. त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे ,जिल्हा अँटी व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रायगड ,पनवेल महापालिका आयुक्त यांना देखील केली आहें
कोविड १९ आजाराचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि उपचारार्थ असलेले रुग्णालये कमी पडत आहेत. सध्या उपजिल्हा रुग्णालय पनवेल, एमजीएम रुग्णालय कामोठे ,इंडिया बुल्स सोमटणे येथे कोविड पॉसिटीव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी उपलब्ध बेड्सची मर्यादा असल्याने व इंडिया बुल्स येथे रुग्णाची होणारी गैरसोय पाहता आणि वाढती रुग्ण संख्या पाहता पनवेल, उरण अथवा सिडकोने विकसित केलेल्या परिसरात अद्यावत असे कोविड समर्पित रुग्णालये सिडकोने विकसित करावे अशी मागणी जागृती फॉउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुलुंड येथे महाराष्ट्र राज्य सरकारने सिडकोला महामंडळाला आदेश देऊन असे अद्यावत रुग्णालय सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सिडकोने केवळ एक महिन्याच्या कालावधीतच अद्ययावत असे अठराशे बेड्सचे कोविड समर्पित रुग्णालय तयार केले असून काही दिवसातच ते रुग्णाच्या सेवेस उपलब्ध असेल. सिडकोने पनवेल, उरण, नवी मुंबई भागातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वसाहती विकसित करण्यासाठी संपादित केल्या, संपादित करून अजून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना वसाहती विकसित झाल्या. ह्या वसाहती विकसित करताना हजारो कोटींचा नफा सिडकोने मिळवला. आज सिडको महामंडळ इतर महामंडळांपेक्षा नफ्यात आहे. वसाहती विकसित करताना सिडकोने येथील पायाभूत सुविधांना बगल दिली आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र दरात संपादित करून वसाहती निर्माण करताना येथील आरोग्याच्या बाबतीत अद्यावत असे रुग्णालय विकसित करताना सिडकोला विसर पडला आहे. मात्र आता जागतिक महामारी, साथ रोग पसरत असताना येथील भूमिपुत्रांसाठी, येथील कोविड बाधित रुग्णांसाठी मुलुंड येथे जसे अद्यावत कोविड समर्पित रुग्णालय केले आहे. तसेच या भागात निर्माण करून भूमिपुत्रांविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी. मुलुंड येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये ज्याप्रमाणे वातानुकूलित यंत्रणा, सी सी टी व्ही निगराणी प्रणाली व सार्वजनिक घोषणेची व्यवस्था ,अग्नी सुरक्षा व्यवस्था ,थंड व गरम पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाय फाय व्यवस्था, पुरुष व स्रियांसाठी प्रसाधन गृह, स्नान गृह, कॉन्टॅक्ट लेस मॉनिटरींसाठी कॉन्टॅक्ट लेस क्लिनिक ,प्रत्येक बेडसाठी लॉकर व्यवस्था अशा सोईनेयुक्त असे कोविड समर्पित दोन हजार बेडचे रुग्णालय पनवेल, उरण, नवी मुंबई भागात लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी निलेश सोनावणे यांनी महाराष्ट्र शासन, सिडको महामंडळाकडे केली आहे.






Be First to Comment