Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील गावबंदी शासकीय नियमानुसार आहे का ?


अनवधानाने एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? ###


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ###

राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला आहे. याची एवढी दहशत निर्माण झाली की, ज्या भागात पेशंट वाढतात तेथील गावागावांमध्ये गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे, तर काही ठिकाणी घेतला जात आहे. मात्र हा निर्णय जरी चांगला असला तरी त्याला शासकीय पातळीवर मंजुरी आहे का? असा सवाल या निमित्ताने उभा रहातो. जर नसेल तर एखादी दुर्घटना अनवधानाने घडली तर त्याला जबाबदार कोण? असेल असाही सवाल या निमित्ताने उभा रहात आहे. तरी शासकीय अधिकारी वर्गांनी फक्त कागदोपत्री आदेश देण्याऐवजी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने पुढाकार घेत याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.
कोरोनाची दहशतीपुढे राज्यातील जनता हतबल झाली आहे. कोरोना कोविड १९ च्या आजारांने बळींचाही आकडा फुगत चालला आहे. उरण तालुक्यातील गावागावात कोरोना पसरून बळींचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांनी गावात कोरोना पसरू नये म्हणून गावबंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन नुसता गावबंदी करून हा प्रश्न मार्गी लागणार नाही तर संपूर्ण उरण मग ते शहर, गाव अथवा कंपन्या असतील हे सर्व काही दिवस बंद ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पूर्णपणे लॉकडाऊन घेतले तर नक्कीच काहीतरी फरक जाणवेल असे वाटते.
तालुक्यातील गावामधील नागरिकांनी आपल्या हिताच्या दृष्टीने चांगला निर्णय घेण्यात आला आहे. हे जरी खरे असले तरी काही ठिकाणी अशीच गावबंदी असताना रात्रीच्या सुमारास कोणी परगावातील व्यक्ती आल्यावर अनवधानाने मारहाण झाली तर परिस्थिती झाली तर नाहक त्यामध्ये ग्रामस्थ अडकण्याची शक्यता आहे.
या सर्वाचा विचार करून तालुक्यातील गावातील गावबंदी करण्यास ग्रामस्थांना कोणती नियमावली आहे. याची माहीती द्यावी त्यानुसार काम करणे सोपे होईल. तसेच कायद्याच्या चौकटीत काम केल्याने ग्रामस्थ नाहक अडकणार नाहीत. तरी प्रशासनाने ग्रामस्थांना याची माहीती द्यावी. जेणेकरून कोरोनातून लवकर सुटका होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.