Press "Enter" to skip to content

केलेले पंचनामे गेले कुठे ?

निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झालेला ग्रामीण भाग अद्याप मद्दतीपासुन वंचित

वरसगांव मधील पद्मावती नगर येथील राजेंद्र वडे यांच्या घराचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले



सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )

३ जून रोजी रायगडात भयानक झालेल्या निसर्ग चक्रवादळात अनेकांची घरे उध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले असून त्यांचे शासकीय तसेच स्थानिक पातळीवर पंचनामे केले.परंतु ग्रामीण भागातील काही नुकसानग्रस्त अद्याप एक महिन्यानंतरही मद्दती पासुन वंचित असल्याचे पहावयास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही मोजक्याच नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली आहे.परंतु निसर्ग चक्रवादळात नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील बहुतेक कुटूंब बाधितांना एक महिन्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नाही.या उलट विश्व हिंदू परिषद व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन पत्रे व कौले यांचे वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला आहे.परंतु शासनाच्या मार्फत पंचनामे करुनही मद्दत मिळाली नसून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पत्रे व्यवसायिकांनी यांच्या कडून जास्त पैसे उकलले जात होते.त्यांच्यावर देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला व नागरिकांना कामधंदा नसल्याने नागरिक हतबल झाले असतांना रायगडात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निसर्ग चक्री वादळाने रौद्ररुप धारण करून संपुर्ण रायगड सह रोहा तालुक्यातील कोलाड, खांब,देवकान्हे, सुतारवाडी,परिसरातील अनेकांचे संसार उदवस्त केले व कुटूंबच्या कुटूंब रस्त्यावर आले.या वादळाने अनेकांची घरे,पत्रे यांची पडझड झाली तर काही घरेच जमीनदोस्त झाली तर काहींचे धान्य ही भिजवून नुकसान झाले या परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी स्थानिक आमदार खासदार मंत्री यांनी

नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली पंचनामे झाले मात्र त्याची भरपाई अद्याप नाही.
निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्हा प्रशासनाकडे ३७४ कोटी ३लाख १६ हजार रु.अनुदान नुकसानग्रस्त यांच्या करीता प्राप्त झाले असून २८४कोटी ८लाख ६६ हजार ३५९रु. वाटप तर ८९कोटी ९४लाख ६४१ रु.शिल्लक असे दाखवले असले तरी बहुतेक ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नाही असल्याची तकार समोर आले आहे.यामध्ये वरसगांव मधील पद्मावती नगर येथील राजेंद्र पुंडलिक वडे हे अपंग असून यांचे संपूर्ण छप्पर उडाले असून घराच्या भिंती ही कोसळल्या आहेत परंतु अद्याप त्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नाही त्याच बरोबर बाहे येथील गणेश नारायण थिटे यांचे २९ एप्रिल रोजी भयानक झालेल्या चक्रीवादलात संपूर्ण घर गेले त्यांना अद्याप मदत नाही हे दूर परंतु यांच्या केलेल्या पंचनाम्यांचा पत्ताच नाही खऱ्या नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना अद्याप रक्कमेचा धनादेध मिळालीच नाही पण नाममात्र नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मग हा पैसा कोणाला वाटला यांची यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.