शुक्रवारी सात नवे रुग्ण ,एकूण 94, तर पंचवीस बरे ###
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे ###
कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे.कोरोना या विषाणुची सर्वंत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनीत परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भिती निर्माण केली आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असून नविन पोसरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी नव्याने सात जणांचे कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले असून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 94 जण कोरोनाने बाधित झाले आहेत.तर पंचवीस जण बरे होवून घरी परतले आहेत.यात वासांबे मोहोपाडा शुक्रवारी दुपारपर्यंत खाने आंबिवली एकूण चार यात बेचाळीस व अडुसष्ट वर्षीय महिला–एकोणीस वर्षीय दोन तरुण,आली आंबिवली एक ऐंशी वर्षीय महिला,मोहोपाडा बाॅम्बे डाईंग काॅलनी एक छप्पन वर्षीय पुरुष, नविन पोसरी चौतीस वर्षीय पुरुष असे शुक्रवारी सात जणांना कोरोनाची बाधा होवून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 94 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.यातील नविन पोसरी येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसांपासून रोजच वाढत चालल्याने वासांबे मोहोपाडा हद्द कोरोनाचे हाॅटस्पाॅट होवू पाहतोय,यासाठी परीसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी,ग्रामपंचायत व प्रशासनाने एकत्रित येऊन कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.तर नजीकच्या चौक येथे शुक्रवारी पंधरा जणांचे अहवाल पाॅजिटीव्ह आल्याची माहिती चौक मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आपल्या स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.रसायनीकरांनो आतातरी सावध व्हा! विनाकारण घराबाहेर पडणे टाला,सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करा असे आवाहन पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे.
Be First to Comment