Press "Enter" to skip to content

कोरोनाचे Side Effect

पर्यटन सुरु झाल्यावर माथेरान हॉटेल व्यवसायिकांसमोर समस्यांचा डोंगर ###

महिन्यातून फक्त विकेंड लाच व्यवसाय ###

परप्रांतीय निघून गेल्याने कर्मचाऱ्यांची वानवा ###

मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट ###

सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे ) ###

राज्य शासनाने पर्यटन व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या असून अटीशर्तींवर पर्यटन सुरु केले जाऊ शकते ह्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत पण 33% जागेचा वापर व्हावा व त्याबरोबर इतर अटींमुळे मिळकत कमी व खर्चच जास्त अशी अवस्था माथेरानमधील व्यावसायिकांची होणार असल्याने पर्यटन सुरु होऊन हि त्याचा काहीही फायदा छोट्या व्यावसायिकांना होणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे .

राज्य शासनाने आठ जुलै पासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे पण छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फाटकाच बसणार आहे ज्या नियम व अटीं शासनाने व्यावसायिकांना दिल्या आहेत त्या खूपच खर्चिक आहेत व माथेरानसारख्या पर्यटनस्थळी महिन्यातून फक्त विकेंडलाच पर्यटन व्यवसाय मिळत असल्याने हा सर्व खर्च करून व्यवसाय करणे म्हणजे सफेद हत्तीचं पाळण्यासारखा आहे आधीच पर्यटन हंगाम हातचा निघून गेल्यामुळे कंबर खचलेल्या माथेरानकरांना एकीकडे कोरोनाशी दोन हात करावे लागत असताना आता का खर्च करून व्यवसाय सुरु करावा का ह्या चिंतेने ग्रासले आहे आणि इतके करूनही एखादा कोरोनाग्रस्त पर्यटक येऊन येथे विषाणू सोडून गेल्यास त्याचा फटकाही येथील स्थानिकांनाच बसणार आहे .

हॉटेल व्यवसाय चार महिन्यानंतर सुरु करणे म्हणजे ह्या जोरदार पावसामध्ये एक दिव्यच आहे आधीच परप्रांतीय कर्मचारी आपआपल्या राज्यात निघून गेल्यामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे व येथील आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील लोक हि शेतीची कामे सुरु झाल्यामुळे माथेरानकडे फिरकेनासी झाली आहेत त्यामुळे शासनाच्या अटी शर्तींचे पालन करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना अडचणीचे ठरणार आहे.

त्यातच प्रशासनाची कोणतीही मदत येथील व्यावसायिकांना मिळत नसल्याने व्यवसाय सुरु होताच शासकीय कर,पाणी बिले,वीज बिले,व शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल व्यवसाय सुरु आहे का हे पाहण्यासाठी चार महिने गायब असलेला अधिकारी वर्ग लगेच येणार आहे. त्यामुळेच माथेरानमधील लहान मोठे उद्योजक हा निर्णय कसा घ्यावा ह्या चिंतेत सापडले आहेत व्यवसाय सुरु केल्यास थोडाफार कमाईचे साधन सुरु होणार व पर्यटक आले तर कोरोनाच्या प्रसाराचे संकट त्यामुळे येथील स्थानिकांच्या ह्या निर्णयामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.