सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
सोन्याचे वाढते भाव पाहून पावसाळ्यात पण दरदरून घाम फुटत आहे. अशा परिस्थितीत तीन तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झालेल्या राजेश घोङके याना खोपोली पोलीस आणि सीसी टिव्हीमुळे काहि तासातच चेन परत मिळाली.राजेश एकनाथ घोङके मंगळवारी संध्याकाळी खोपोली बाजारपेठेत खरेदिसाठी गेले होते. कार मधून उतरत असताना गळ्यातील तीन तोळ्याची चेन रस्त्यावर पङल्याचे त्यांच्या लक्षात आले नाहि.कारच्या दरवाजा जवळ पङलेली सोन्याची चेन जवळून दोन पादचारी आणि वाहन जावून सुद्धा त्यांचे लक्ष गेले नाहि.त्यानंतर आलेल्या पादचारी इसमाचे चेनकङे लक्ष गेल्यावर त्यानी चेन आजूबाजूला पाहत कोणाचे लक्ष नाहि याची खाञी करत चेन खिशात टाकली.परंतु त्याच वेळेस तिस-या ङोळ्यानी टिपले होते.
राजेश घोङके याना चेन गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानी तातङीने खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यावर सपोनी सतीश अस्वर,पोलीस नाईक दिनेश गायकवाङ, महिला पोलीस चंदा गायकवाङ,पोलीस कर्मचारी भालेराव यानी बाजारपेठेतील सीसी टिव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला.टप्प्या टप्प्यावरचे सीसी टिव्ही फूटेज तपासत चेन उचलणारा इसम कोणत्या इमारतीत शिरला याची माहिती मिळाली.पोलीस पथकानी सदरच्या इसमाचे फूटेज आसपासच्या दुकानदाराना दाखवल्यानंतर इसम तिथेच राहत असल्याची पोलीसांची खाञी झाली.
पोलीस तपास करित घरी आल्याचे समजताच कामावर गेलेल्या इसमाने पोलीस ठाण्याची वाट पकङत चेन पोलीसांचे हवाली केली.तिस-या ङोळा असलेला सीसी टिव्ही मुळे खोपोली पोलीसांच्या कौशल्यपूर्ण तपासाने अवघ्या काहि तासातच राजेश घोङके याना चेन परत मिळाली.
Be First to Comment