प्रत्येक टाकीमागे शंभर रुपयांची बचत ### जीवनावश्यक वाहतुकीसाठी परवानगी हा माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णय ### गैरवापर टाळणे हे माथेरानकरांसाठी आव्हान ###
सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे) ###
माथेरानकरांच्या अनेक दिवसांची मालवाहतुकीसाठी असलेल्या मागणीला आज यश आले असून गॅस ने भरलेला टेम्पो आज माथेरानमध्ये दाखल झाल्याने माथेरानकरानी त्याचे उत्साहाने स्वागत केले . लॉकडाऊन सुरु झाल्यापासून माथेरानकरांची आर्थिक कोंडी सुरु झाली होती माथेरानमधील नागरिकांना हाताला काम नसल्याने भीषण संकंटांना सामोरे जावे लागत होते मालवाहतुकीची समस्या जटिल असल्याने महागाईच भस्मासुर पोखरत चालला होता त्यावर उपाय योजना करताना माथेरान नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मालवाहतुकीसाठी वाहनास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती पण त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही लोकडाऊन तर पुढे सरकत असताना माथेरानकरांच्या समस्यांमध्ये मात्र वाढच होत होती अशा वेळी माजी आमदार सुरेशभाऊ लाड व माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मा.उच्च न्यायालयाचे दार थोटाऊन माथेरानकरांच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या पण त्यालाही फाटा देताना मालगाडीच्या माध्यमातून मालवाहतुकीची परवानगी देण्यात आली पण परवानगी माथेरानकरांसाठी अन्याय कारक होती कारण ह्या सेवेमुळे माथेरानकरांचा खर्च चारपट वाढणार होता,त्यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी याविषयीच्या पाठपुराव्यासाठी चिकाटी आणि सातत्य ठेवल्यामुळे अखेर गॅस पुरवठा सेवा उपलब्ध झाली आहे.
नागरिकांची या माध्यमातून शंभर रुपयांची बचत होणार असल्याने सुनील शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नेरळ ते दस्तुरी टॅक्सी स्टॅन्ड तेथून अमनलॉज स्टेशन ,तेथून माथेरान मालगाडी द्वारे व माथेरान स्टेशन ते घर असा खर्च तर वाढणार होताच पण त्याबरोबर हा वेळखाऊ व मेहनत वाढविणारा प्रवास करावा लागत आहे पण एवढा प्रवास केल्यानंतरही माल व्यवस्थित पोहचेल का ह्याची शाश्वती नाही त्यामुळे हा पर्याय माथेरानकारानी नाकारला व मालगाडीतून गॅस टाकी वाहून नेण्यास रेल्वे बोर्डानेही नकार दिल्याने शासन माथेरानकरांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे पुन्हा एकदा सिध्य झाले जेव्हा मालवाहतुकीस वाहनास परवानगी मागत असताना मिनीट्रेन चा अट्टाहास शासन कशासाठी करीत आहे जर प्रदूषणाचा विचार केला तर एक टेम्पो ऐवजी रेल्वेचे दोन शक्तिशाली डिझल वर चालणारी इंजिने धूर ओकत ह्या मार्गावर धावत असतानाही त्यांनाच चालण्यास परवानगी मिळते हा विरोधाभासच आहे त्यामुळे पुन्हा न्यायालयाचे दार खटकविल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर माथेरान करानासाठी आज वाहनाद्वारे गॅस टाक्यां घेऊन येणार टेम्पो आज दाखल झाला.
सध्या माथेरानकरांना दर आठवड्यास अडीचशे टाक्या लागतात पण सध्या सुरु असलेल्या वाहनाद्वारे हि मागणी पूर्ण होऊ शकत नाही पण माथेरानचे स्थानिक प्रशासन हि समस्या सोडविण्यास पुढाकार घेणार आहे व माथेरानकरांना सुरळीत गॅस पुरवठा होईल ह्याची काळजी घेणार असल्याचे ह्या वेळी मुख्याधिकारी श्री.प्रशांत जाधव यांनी सांगितले . ह्या सेवेमुळे माथेरानकरांचे 90 रुपये वाचणार असून सध्या 686 रुपये मोजत असलेल्या टाकीस आता 596 रुपये भरावे लागणार आहे
——————————————————– माथेरानकरांना मालवाहतुकीमुळे जादाचे पैसे आकारावे लागत असल्याने उच्च न्यायालयाचे दार ठोकवून हि परवानगी मिळवण्यास प्रयन्त केले व वेळोवेळी माथेरानकरांसाठी त्यांच्या सोबत राहून त्यांच्या समस्यां सोडविण्यास अग्रेसर राहू. अजय सावंत, माजी नगराध्यक्ष माथेरान
———————————————————
माथेरान ला सुरु झालेली हि वाहतूक माथेरानकरांसाठी बदलाची नांदी असून वाहतुकीसाठी एका टाकी मागे लागणारे जादाचे35 रुपये आता नगरपालिकेकडून अदा केले जातील.प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा माथेरान
—————————————–;;;






Be First to Comment