पेण प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 पीपीई किटसह 400 माक्सचे वाटप
- पेणच्या सह्याद्री प्रतिष्ठानचा देखील पुढाकार
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)
जगभरात कोरोनाने हाहाकार माजविल्यानंतर प्रत्तेक देशामध्ये अनेक फक्त संस्था, कंपन्या,सामाजिक कार्यकर्ते हातभार लावत आहेत आपला देश आणि महाराष्ट्र राज्य देखील याला अपवाद नाही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी विनंती केल्यानंतर मेसर्स ऑरेंजस्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सौजन्याने आणि सह्याद्री प्रतिष्ठान पेणच्या मार्फत सावरसई प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,कर्मचारी यांना 100 पीपीई किटसह 400 मास्कचे वाटप नुकताच करण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या या डॉक्टरांना अशा प्रकारची मदत करून ऑरेंज स्मार्ट सिटी कंपनी आणि सह्याद्री प्रतिष्ठानने एक पाऊल पुढे टाकून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे यामुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारी यांना स्फूर्ती मिळणार आहे. ऑरेंज स्मार्ट सिटी कंपनीने लॉकडाउन काळात सुरुवातीला ठिकठिकाणी जवळपास दीड हजार कुटुंबियांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या सुद्धा वाटप केल्या असून डॉक्टरांना यापुढे देखील काही आवश्यकता भासली तर एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ते मदत करणार असल्याने समाजाप्रती या कंपनीची असणारी आस्था समोर आली असून यापुढे अधिक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
( कोरोना योद्धा म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे शासनासह सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे सुद्धा काम आहे.त्यामुळे येथील डॉक्टरांनी केलेल्या मागणीनुसार आम्ही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना 100 पीपीई किट आणि 400 मास्कचे वाटप केले आहे.
समीर म्हात्रे – अध्यक्ष,सह्याद्री प्रतिष्ठान )
( आम्ही केलेल्या मागणीनुसार आमच्या रुग्णांसह आमची स्वतःची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ऑरेंज सिटी कंपनी आणि सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन आम्हाला जे किट वाटप केले आहे त्यातून आमच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी आम्हाला अधिक स्फूर्ती मिळणार आहे.
आशुतोष मोकल- वैद्यकीय अधिकारी – पेण उपजिल्हा रुग्णालय )
Be First to Comment