Press "Enter" to skip to content

बागेचे सुशोभीकरण महत्त्वाचे की कामगारांचे व उरणकरांचे आरोग्य ?


जे एन पी टी विश्वस्त भूषण पाटील यांचा सवाल ###

सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / उरण ###

एकीकडे संपूर्ण जगात महामारी विरूद्ध लढाई सुरु आहे तर जे एन पी टी मध्ये बागेच्या सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली मलिदा खाण्यात काही अधिकारी गुंतले आहेत. अगोदर वसाहत दुरुस्त करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला पण हाती काहीच आले नाही. उलट लिकेज च्या प्रमाणात वाढ झाली. आता बागेचे सुशोभीकरण करण्यासाठी सहा कोटी चे नवीन टेंडर काढले आहे. टाऊनशिप गेटच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी व प्रशासन भवनाच्या नूतनीकरणासाठी चाळीस कोटीचे टेंडर काढले आहे. असा एकूण पन्नास कोटीचा चुराडा करण्याचा घाट घातला आहे. ही सगळी कामं नंतरही होऊ शकतात. त्यासाठी इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही. खरी गरज आहे ती चांगल्या प्रकारची साधने पुरवण्याची. चांगल्या प्रतीचे मास्क, व्हेंटिलेटर तसेच इतर अनेक आवश्यक गोष्टी घेण्यापेक्षा नको त्या ठिकाणी अनावश्यक खर्च केला जात आहे. बागेची देखभाल केली पाहिजे पण सध्याच्या परिस्थितीत इतका खर्च करणे उचित नाही. हे टेंडर त्वरित रद्द करण्याची मागणी जे एन पी टी चे विश्वस्त भुषण पाटील यांनी जे एन पी टी चेअरमन यांना पत्राद्वारे केली आहे. जर ह्याची योग्य दखल घेतली नाही तर अंतर्गत युनियनच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

प्रशासन भवनाच्या नूतनीकरणासाठी व बागेच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाचा पैसा उरण तालुक्यातील जनतेच्या कोरोना रोगाविरुद्ध लढ्यासाठी वापरणे संयुक्तिक ठरेल असा सल्लाही त्यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.