13 जुलै ते 16 जुलै या तीन दिवसांचा असणार आहे लॉकडाऊन ###
सिटी बेल लाइव्ह / उरण / अजय शिवकर ###
उरण तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता 3 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
13 जुलै ते 16 जुलै या तीन दिवसांचा असणार आहे हा लॉकडाऊन. आवश्यकतेनुसार लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेतही उपविभागीय अधिकारी दत्तु नवले यांच्याकडून देण्यात आले आहेत.
यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद असणार असून, नागरिकांना आवश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर येण्यास बंदी असणार आहे. तर मेडिकल, दूध डेरी, कृषी बीज दुकाने, बँका, जीवनावश्यक वस्तू विक्री सुरू राहणार आहे.
जाणुण घ्या काय राहणार सुरू काय राहणार बंद
१) अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता उरण तालुक्याच्या असेल,
२) या कालावधीत सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना उरण तालुक्यामध्ये परवानगी दिली जाणार नाही, टॅक्सी, ऑटोरिक्षा, यांनाही प्रवाशी हददीत लॉकडाऊन लागू वाहतुकीची परवानगी असणार नाही. तथापि, आपत्कालिन वैद्यकिय सेवा घेण्यासाठी/देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या आदेशांतर्गत ड्रायवर शिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनाश्यक बस्तु, आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.
३) सर्व आंतराराज्यीय बस आणि प्रवासी वाहतुक सेवांचे, (खाजगी वाहनांसह), तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद असेल तथापि बाहेरुन येऊन, बाहेर जाणान्या टरिस्ट वाहनांना परवानगी असेल,
४) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला/त्याला शासनाच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरीत केले जाईल,
५) सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, वरील परिच्छेद-२ मध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करुन, केवळ परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर येतील.
६) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बायींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तीना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. पना, कार्यालये आणि कार्यशाळा इत्यादीसह सर्व दकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. तथापी.सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक यूनिटसना परवानगी असेल, तसेच डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादीच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफंक््वरंग युनिटस चालविण्यास परवानगी असेल,
८) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचान्यांसह चालू ठेवण्याची परवानगी असेल आणि ते चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून ३ फुट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराधी खात्री करण्यासाठी पावले उचलतील. ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि (हात) सनिटायझस/हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करतील.
९) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणान्या खालील दुकाने/आस्थापनांना वरील प्रतिबंधामधून वगळण्यात येत आहे.
a) बँक/एटीएम/विमा आणि संबंधित बाबी.
b) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे.
c) आय.टी. आणि आयईएस, टेलिकाँम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांसह.
d) पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तुची वाहतुक व उपलब्धता.
e) कृषी वस्तु आणि उत्पादने आणि सर्व वस्तूंची निर्यात आणि आयात,
f) अन्न, फार्मास्युटिकल्स आणि वेद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तुंचे ई कॉमर्स (वितरण)
g) पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापने,
h) रुग्णालये, फार्मासि आणि ऑप्टिकलस्टोअर्स, फार्मास्युटिकल्स मंन्यूफक्यरिंग आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक,
i) पेट्रोलपंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी. त्यांची गोदामे आणि त्यांची संबंधित बाहतुक कार्य केवळ अत्यावश्यक सेवेतील पास धारकांसाठी
j) सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा (ज्यात खाजगी एजन्सीद्वारे) आवश्यक सेवा पुरविणान्या संस्थांना पुरविल्या जातात.
k) खाजगी आस्थापना, ज्या आवश्यक सेवांच्या सहाय्यकारी सेवा किंवा कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी सहाय्य करणान्या सेवा.
l) वरील संबंधित पुरवठा साखळी.
m) मद्यविक्री दुकाने केवळ होम डिलीव्हरी अनुझेय आहे.
n) जे इंडस्ट्रीयल युनिट सद्यस्थितीत सुरु आहेत ते तसेच सुरु राहतील.
१०) राज्य सरकारचे विभाग/कार्यालये आणि सेवा प्रदान करणारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) केवळ अत्यावश्यक सेवा प्रदान करण्याच्या मर्यादेपर्यंत कार्य करतील,
११) कोविड-१९ रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वेकल्पिक शस्त्रक्रिया नियोजित करण्यात याव्यात.
१२) संबंधित संस्था संघटना व आस्थापनांच्या संदर्भात मा.पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त अधिकारी, महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि इतर सक्षम प्राधिकारी उपरोक्त नियम आणि अंमलबजावणीसाठी अधिकृत, माणूसकीच्या व न्याय मार्गाने सर्व आवश्यक उपाययोजना करतात.
१३) या नियमांच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यव्ती/संस्था यांचेवर महामारी रोग अधिनियम १८९७. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अंतर्गत इतर संबंधित कायदे व नियमांच्या तरतूदीनूसार कारवाई केली जाईल.
१४) या नियमांनसार कोणत्याही गोष्टी केल्यास किंवा चांगल्या हेतूने कोणत्याही गोष्टी केल्यास, त्या व्यक्तीविरुध्द खटला किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही.
१५) पुढील प्रकारच्या लोकांना पोलीस यांनी त्यांचे ओळखपत्र तपासून लॉकडाऊन क्षेत्राच्या बाहेर सोडावे,
१.शासकीय ओळखपत्र धारक कर्मचारी,
२. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगर पालिका इत्यादी कर्मचारी,
३. बैंक कर्मचारी,
४. BSNL, MTNL कर्मचारी,
५. हॉस्पीटल कर्मचारी,
६. पत्रकार,
७. जेएनपीटी कर्मचारी,
१६) किराणा व भाजीपाला यांची घरपोहोच (Home Deivery) सेवा सकाळी ९.०० वा. ते रात्री ७.०० वाजेपर्यंत चालू ठेवता येईल,






Be First to Comment