सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ###
पनवेल ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने दमदार सुरवात केल्याने बळीराजा सुखावला असून लावणीसह इतर कामांना त्याने जोरदारपणे सुरवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. ग्रामीण भागात आजही पारंपारिक शेती केली जाते. तालुक्यातील वावंजा, तळोजा, धरणे, कसळखंड, नेरा, साई, कर्नाळा, भाताण, आजिवली, तारा, बारापाडा आदी गावांमध्ये आजही शेती केली जाते. कित्येक ठिकाणी पालेभाजीचे पिकही घेण्यात येते. सध्याच्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून त्यांनी लावणीला सुरवात केली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या पिकावर चांगला होण्याची शक्यता शेतकरीवर्गाकडून वर्तविण्यात येत आहे. सध्या शेती बांधावर लावणीची कामे करताना व्यस्त असलेले शेतकरी व त्याचे कुटूंबिय आणि कामगारवर्ग दिसत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील 8 ते 10 दिवसात लावणीची कामे पूर्ण होतील असे सध्याचे चित्र आहे.
Be First to Comment