सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) ###
उरण शहरात व तालुक्यात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे.आज उरणमध्ये मोठा आकडा म्हणजे एकूण ३० जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये शहरात सर्वाधिक म्हणजे १२ जण पॉजेटीव्ह सापडले आहेत. पूर्वी शहरातील पॉझिटिव्ह सापडल्याची विभागाप्रमाणे माहिती प्रसिद्ध होत होती. मात्र ही माहिती काही दिवसांपासून यादीत प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे शहरात कोणत्या भागात किती पॉजेटीव्ह आले याची माहिती कोणालाच होत नाही. तरी शहरातील यादी वाईच माहिती देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उरणमध्ये कंपनी प्रशासनावर शासकीय दबाव नसल्याने कंपनीतील अनेक कामगार पॉझिटिव्ह सापडत आहेत. याची दखल घेतली नाहीतर परिस्थिती आणखीन गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही. आजचा पॉझीटिव्हचा आकडा बघून प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलण्याची गरज आहे.
आज उरण १२, चिरले १, विंधणे १, चिरनेर २, डोंगरी १, जसखार ३, जेएनपीटी २, खोपटा १, हनुमान कोळीवाडा १, मुळेखंड १, मोरा २, गोवठणे १, चाणजे १, सोनारी १ असे एकूण ३० जण पॉजेटीव्ह सापडले आहेत. तर उरण १, सोनारी १, रांजणपाडा १, वशेणी १, केगावं ३ असे ७ जणांना घरी सोडण्यात आले.
एकूण पॉजेटीव्ह ४२०, उपचार घेणारे १५७, बरे झालेले २५४ तर मयत ९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
करंजा गावा नंतर उरणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉजेटीव्ह सापडल्याने खळबळ माजली आहे. उरणकर भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. उरण शहरात सापडणाऱ्या पॉजेटीव्हची ठिकाणे न देण्यामागचे कारण समजत नाही. यापूर्वी शहरातील विभागवाईज माहिती मिळत होती. त्यामुळे कोणत्या भागात पॉजेटीव्ह आढळला आहे, याची माहिती मिळत होती. परंतु आता फक्त उरणची आकडेवारी दिली जात असल्याने यामागे काहीतरी लपाछपी असल्याची चर्चा उरण शहरातील नाक्यांनाक्यावर सुरू आहे. तरी प्रशासनाने पूर्वी प्रमाणेच शहरातील विभागवाईस आकडेवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Be First to Comment