Press "Enter" to skip to content

सुधागडवासीयांना दिलासा : सुधागड तालुक्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही..!

सुधागड कोरोना मुक्त झाल्याने सुधागडवासीय सुखावले : शेवटचा रुग्ण परतला घरी ###

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) ###

पाली, वावळोली येथील कोव्हीड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी परततांना कोरोना रुग्ण.

रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत असताना सुधागड तालुका मात्र आजमितीस कोरोनामुक्त झाल्याने सुधागड वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  पालीतील 4 कोरोना बधितांना मंगळवारी (दि.7) तर उर्वरित एका कोरोनाबाधित रुग्णाला गुरुवारी (दि.9) वावळोली कोव्हीड केअर सेंटर मधून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे सुधागड तालुक्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण राहिलेला नाही. आरोग्य विभाग व तहसिल प्रशासन यांचे योग्य व अचूक नियोजन याबरोबर नागरिकांचे सहकार्य सुधागडला कोरोनामुक्त करण्यास उपयुक्त ठरले.

     या सर्वांना 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे एकूण 7 रुग्ण होते. आणि आता हे सर्व रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

   लोकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करून प्रत्येकाने खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.