सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार ) ###
रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना आजाराचा धोका वाढत असून, आज नव्याने ४ रुग्ण आढळल्याने भय इथले संपत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या रोहा तालुक्यात सुदर्शन कंपनीचे रोहावर कोरोनाचे सुदर्शनचक्र फिरले आहे असे बोलले जात असून,सब़ध तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे.या वाढत्या संख्येने रोह्यातील नागरिकांच्या मनात मोठया प्रमाणात भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे साधी शिंक आली तरी नागरिक डॉक्टरांनकडे लगेचच धाव घेत आहे.त्यामुळे अशा भयभीत झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे सोडून काही खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून ठेवले असल्याचेही निदर्शनास आले आहे.त्यामुळे अशा डॉक्टरांनवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही होत आहे. आज तालुका प्रशासन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार कोरोनाचे ४ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. यापैकी १३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ७६ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु आहेत.तर कोरोना मुळे आतापर्यंत मयत झालेल्या रूग्णांची संख्या २ आहे. तरी या महामारीत आपले व आपल्या परिवाराचे सवरक्षण करून या आजारापासून लांबचं कसे राहता येईल याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आहवान करण्यात आले आहे.
Be First to Comment