Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणचे व्यापारी वर्ग चिंतेत


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ###

उरणमध्ये कोरोना कोविड १९ ची दहशत वाढली आहे. त्यात आता व्यापारी वर्गांनाही कोरोनाचा विळखा पडू लागल्याने उरणमधील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.यामुळे कोरोना हरविण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरात व तालुक्यातही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दररोज कोरोना पॉजेटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यात आता कोरोनाची बाधा व्यापारी वर्गांनाही होऊ लागली आहेत. काही व्यापारी दवाखान्यात उपचार घेत आहेत तर काही बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो अधिक जोमाने वाढताना दिसत आहे. त्यात व्यापाऱ्यांचाही आकडा वाढत असल्याने व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहे. कोरोनाने गेल्या ४ ते ५ महिन्यापासून सर्वांनाच लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे कोरोनारुपी संकट लवकर दूर होईल असे वाटत नाही. ते ओझे घेऊनच आपल्याला आता जीवनाशी झगडत जगण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
कोरोनाच्या भीतीपोटी व्यवसाय करायचा की नाही अशा कैचीत व्यापारी वर्ग सापडला आहे. काही व्यापारी वर्गांना दुकान बंद ठेवावे असे वाटते पण बाजारपेठ बंद करावयाला लागेल. तर काहींच बाजारपेठ बंद करण्यास विरोध आहे. तसे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे असे मानावे लागेल कारण काही व्यापारी वर्गांची दुकानांची जागा स्वतःची नसल्याने त्या भाडे तत्वावर आहेत. तसेच दुकानाचे भाडे अधिक काम करणाऱ्या कामगारांचे पगार व स्वतःचे कुटूंब चालविण्यासाठी या व्यापारी वर्गांना नाईलाजाने दुकाने उघडी ठेवावी लागत असल्याचे काही व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. यावर पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बाजारपेठेतील काही दुकाने आळीपाळीने उघडणे बंद ठेवणे तसेच दुकानाबाहेर फोन नंबर लिहून त्यावर सामानाची यादी घेऊन होणारे बिल सदर ग्राहकाला सांगितले तर ग्राहक दुकानात ठराविक बिलांची रक्कम घेऊन येऊन त्वरित सामान घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे सोशल डिस्टंट ही पाळला जाऊन बाजारपेठही उघडी राहून गर्दीही कमी होईल असे वाटते. दुकानात सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे कठीण आहे. तसेच दुकानात येणार ग्राहक कसा आहे याची माहिती नसते.त्यांचा संपर्क आपल्याशी येतोच.
बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे कोरोना पॉजेटीव्हचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यात व्यापारी वर्गाचाही समावेश असणार आहे. त्यामुळे कोरोना या महाभयंकर विषाणू पासून आपली स्वतःची सुरक्षा करण्यासाठी स्वतःलाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. म्हणूनच कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वांनी डोळ्यात तेल घालून सावध रहाणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना आपल्यावर वर्चस्व गाजविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.