सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (प्रतिनिधी ) ###
देशभर कोरोना महाभंयकर व्हायरसने गेल्या काही महीन्याभरापासून हजारों नागरिकांना ग्रासले आहेत, ती संख्या पाहता पुन्हा एकदा शासनाने काही ठिकाणी १३ जूलै पर्यंत लॉकडाऊन घोषित केला.
नवी मुंबईत सिडकोचे नवे शहर म्हणुन सद्या उलवे नोड खुपच चर्चेत आहे. तेथे ही कोवीड-19 चे अनेक रुग्ण दिवसेंगणित वाढत असल्याने उलवे येथील रहिवाशीयांना कोरोना टेस्टिंगसाठी नवी मुंबई किंवा पनवेल येथे जावे लागते. तसेच उलवे शहरात स्थानिक परिसरातील नागरिकां बरोबरच देशभरातुन अनेक नागरीक नव्याने राहायला आल्याने बहुतेकांना इतर परिसराची माहीती व ओळख नसल्याकारणाने अनेक नागरिकांत खुप मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे.
तसेच शहराची व शहरालगत इतर गावांतील लोकसंख्येचा विचार केल्यास उलवे शहरात सिडको महामंडळाने तातडीने कोविड-19 टेस्टींग लँब सुरू करण्याची मागणी समाजसेवक किरण मढवी यांनी पत्राद्वारे सिडको महामंडळास केली आहे.
Be First to Comment