कँन प्रकल्पाच्या आढावा सभेत ग्रामिण आरोग्य सेवेचे काढले वाभाडे #
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) :
कर्जत तालूक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिला आणी मुलांच्या आरोग्य समस्याकडे आरोग्य विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे कुपोषण वाढण्याची व माता, नवजात शिशु मृत्यू होण्याची स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप कँन प्रकल्पाच्या कार्यकर्त्यानी पंचायत समीतीच्या आढावा सभेत केला.
पंचायत समीती सभापती सूजाता मनवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समीती सभागृहात कम्युनिटी अँक्शन फाँर न्युट्रिशन प्रकल्प कर्जतच्या वतीने तालूक्यातील कूपोषण व आरोग्य सेवा या विषयावर आढावा सभा आयोजित केली होती.
तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रा पैकी कंळब, खांडस, नेरळ व आंबिवली ही आरोग्य केंद्र आदिवासी उपाय योजनेतील असुन आरोग्य केंद्रातील आरोग्य आधिकारी यांनी मार्च महिन्यापासून कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी केली नाही, गरोदर महिलांची पण आरोग्य तपासणी केली गेली नाही परिणामी भागातील गरोदर महिलांना बाळांतपणासाठी कर्जतच्या खाजगी रुग्णालयात जावे लागले खाजगी रुग्णालयात एका सामान्य बाळांतपणासाठी बारा ते आठरा हजार रुपये खर्च आदिवासी व गरीब महिलांना करावा लागणल्याचे पुरावे कँन प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी सादर केले. माता मृत्यू रोखणे साठी सरकार एका बाजूला जननी शिशु सूरक्षा, प्रधानमंत्री मार्तवंदन योजना सारख्या घोषणा करते आहे, संस्थात्मक बाळांतपण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र कर्जतच्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था सरकारच्या धोरणारालच हरताळ फासत आहेत ही गंभीर बाब आढावा सभेत समोर आल्या नंतर संबधितावर कार्यवाही करण्याचे आदेश सभापतीने तालूका आरोग्य आधिकारी यांना दिले. कोविड च्या प्रभावामुळे अंगणवाडीत मुलांना बसवता मुलांचा आहार घरपोच देण्याची सुचना सरकारने केली आहे, हा आहार पुर्ण वेळचे वेळी पोहचतो कि नाही या बाबतचे नियंत्रण नसल्याची बाब पण कार्यकत्यानी या वेळी मांडली,पर्यशिकांच्या अगंणवाडी भेटी कमी असल्यामुळे गरोदर महिलाचे समुपदेशन होत नाही तसेच कूपोषित मुलांच्या घरी होम व्हिजीटपण होत नाहीत परिणामी तालुक्यात नियंत्रानात असलेली कूपोषित मुलाची संख्या वाढण्याची संभावणा नाकारता येणार नाही अशी माहिती कँन प्रकल्पाच्या कार्यकत्या विमल देशमूख यांनी सभेमध्ये दिली.
कँन प्रकल्प राबवत असलेल्या चाळीस गावा पैकी फक्त आकरा गावातच मुलांची आरोग्य तपासणी झाली असून इतर भागात तपासणी करण्यात आली नाही, 14 मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी मुलाचे व महिलाची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देउन सुध्दा तपासणी केली गेली नाही ,संबधीत आरोग्य आधिकांऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी भूमिका पंचायत समीती सदस्यां जयंवंती हिंदोळा यांनी मांडली.
एकात्मिक बालविकास प्रकल्प एक ने यावर्षी पंचायत समिती शेषफंडातुन कूपोषीत मुलांना अडे वाटपाची तरतूद केल्यामूळे व कर्जत तालूक्यात कायम स्वरूपी बाल उपचार ,पोषण पूर्नवसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरी साठी पाठवलेमूळे प्रकल्प आधीकारी पालकर, जिल्हाधिकारी नीधी चौधरी ,जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. कीरण पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला .
तालूक्यातील आदिवासी भागातील तीव्र कूपोषीत व मध्यम श्रेणीतील कूपोषित मुलांसाठी ठाणे जिल्हापरिषदेच्या धर्तीवर होम व्हिसीडीसी सूरू करावी असा ठराव माडंला व सर्वानुमते मंजूर करून जिल्हास्तरावर पाठवण्याचा निर्णय झाला.
पंचायत समीती उपसभापती भीमा पवार, पंचायत समीती सदस्या जंयवंती हिंदोळा,सूरेखा हरपुडे, सदस्य प्रदिप ठाकरे, गटविकास आधिकारी बालाजी पूरी, तालूका आरोग्य आधिकारी सि. के. मोरे , एकात्मिक बालविकास चे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, निशिगंधा भवाळ, कँन प्रकल्पाचे रवी भोई, जयराम पारधी, शांताराम राम निरगूडा, विमल देशमूख, कँन प्रकल्पाचे समन्वयक अशोक जंगले यांच्या सह पंचायत समीतीचे विस्तार आधिकारी,पर्यवेक्षीका आदि उपस्थित होते.
कोव्हिड चे कारण देत कोणी जर आरोग्य आधिकारी गरोदर महिला व मुलांना आरोग्य सेवा नाकारत असतील तर अशा आरोग्य आधिका-यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मी विभागला दिले आहेत.
सुधाकर घारे
-उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती रायगड जिल्हापरिषद
आम्ही मागिल महिनाभरा पासून गाव पातळीवरील आरोग्य सेवेचा आभ्यास केल्यानंतर काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ज्या प्राथमीक आरोग्य केंद्रात महिन्याला 25 ते 30 डिलीव्हरी होतात तीथे आता एक किवां दोन डिलेव्हरी झाल्या आहेत म्हणजे या सर्व डिलीव्हरी खाजगी रुग्णालयात झाल्या ज्याचा खर्च आठरा ते विस हजार च्या घरात आहे. दूसरी धक्कादायक बाब म्हणजे कर्जत शहरात एक खाजगी हाँस्पीटल आहे ज्यानी मान्यता घेतलेली नाही अशा हाँस्पीटल मध्ये या बंहुताश डिलेव्हरी झाल्या आहेत, उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले स्त्रीरोग तद्य मॅडम या हाँस्पीटल मध्ये सेवा देतात ही पण गंभीर बाब असून संबधीताचा लेखी अहवाल आम्ही जिल्ह्याला सादर करणार आहोत .
अशोक जंगले,-सामाजिक कार्यकर्ते ,दिशा केंद्र कर्जत






Be First to Comment