घाट दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप #
सिटी बेल लाइव्ह / रायगड: (धम्मशिल सावंत) :
भारतीय हवामान खात्यामार्फत कोकणाला सातत्याने अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे.त्यानुसार पावसाचा जोर वाढताच नद्यांना पूर, दरड कोसळणे या घटनांत वाढ होताना दिसतेय. कोकणाला पंढरपूर जवळ जोडणाऱ्या महामार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली आहे महाड तालुक्यातील वरंध घाटात उभारण्यात आलेले संरक्षण कठडे अतिवृष्टी दरम्यान कोसळून महामार्गावर आले असल्याने हा मार्ग बंद पडला आहे कोणतीही दुर्घटना घडूनये याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने वाहतूक रोखून धरली असल्याने कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसह प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत.
हा मार्ग बंद होण्याची ही या पावसाळ्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी घाटात दुरुस्तीचा काम केलं जातं मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी करून या कांमाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.






Be First to Comment