रायगड जिल्ह्यातील व्यापारी आणि विक्रेत्यांनी स्वखर्चाने अँटिजेन – आरटीपीसीआर टेस्ट करावी

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) —
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
रायगड जिल्ह्यातील व्यापारी आणि विक्रेत्यांनी अँटिजेन – आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांना १२ ऑगस्ट पूर्वी येण्याचे आवाहन करण्यात आले असताना त्यानंतर येणाऱ्या भक्तांनी स्वॅप टेस्ट करून येण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आणखी सुरक्षिततेचा उपाय म्हणून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यापारी आणि विक्रेत्यांनी अँटिजेन – आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने बहुतांश व्यक्ती या बाजारहाट आणि खरेदीसाठी येत असल्याने व्यापाऱ्यांनी स्वत:ची व कर्मचाऱ्यांची टेस्ट तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक इतर व्यववसायिकांना या टेस्ट स्वखर्चाने टेस्ट करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.






Be First to Comment