Press "Enter" to skip to content

जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज  मुल्ला यांचे आवाहन 

निवृत्ती वेतन धारक / कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी दि.31 ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

निवृत्ती वेतन धारक /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी दि.31ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज  मुल्ला यांनी केले. 

जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड- अलिबाग येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक/ कुटूंब निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची आहे. यासाठी जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांची माहिती मागविण्यात आली असून ती माहिती पुढीलप्रमाणे आहे—

निवृत्ती वेतनधारक/ कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचे पूर्ण नाव, निवृत्ती वेतनधारक/ कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचा पूर्ण पत्ता, निवृत्ती वेतनधारक प्रदान आदेश क्रमांक (PPO NO), बँकेचा तपशिल, बँकेचे नाव, शाखेचे नावे, निवृत्तीवेतनधारक/कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचा बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक (झेरॉक्स जोडण्यात यावी), निवृत्ती वेतनधारक/कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक), निवृत्ती वेतनधारक/कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचा ई-मेल आयडी असल्यास नमूद करण्यात यावा.

     ही माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या to.raigad@zillamahakosh.in या ई-मेल वर अथवा जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्तीवेतन शाखा, हिराकोट तलावाजवळ, रायगड-अलिबाग या पत्त्यावर दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला यांनी कळविले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.