रायगड जिल्ह्यातील खांब येथील आजीबाई नशीबवान !
सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, परंतु या आजीबाईंसाठी काळ आला होता वेळ नाही असेच म्हणावे लागेल ! कारण वयाच्या 90 व्या वर्षी देखील कोरोनाशी झुंज देत त्यांनी आजारावर मात केली आहे. देव तारी त्याला कोण मारी म्हणत आजीबाईंचे कौतुक होत असून शंभरी गाठावी अशा शुभेच्छा त्यांना मिळत आहेत.जुनं ते सोनं म्हणतात ते काही उगाचं नाही !
खांब येथील साईनगर येथील कुटुंब कोरोना च्या विळख्यात सापडले होते घरातील पाच जनाना कोरोना ची लागण झाली होती. एखाद्या कुटुंबात जर कोरोना रुग्ण आढळला तर त्या कुटुंबाला काय मनस्ताप भोगावा लागतो हे जवळून अनेक ठिकाणी पहायाला मिळाले. कुठलाही आजार होऊ द्यात पण कोरोना नको असे बाधित कुटुंब बोलतात. खांब येथील पहिला रुग्ण कुटुंब प्रमुख होता त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते. आपला मुलगा आजारी आहे हे कानावर पडुन सुध्दा आजीबाई हटल्या नाहीत. त्यांनी मुलाची विचारपूस केली.
आजीबाईंना ऑक्सिजन ची खुप गरज होती. एवढ्या वयाचा माणुस पुढे तरी कसा हलवणार त्यामूळे रोहा शासकिय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. वय जरी असले तरी जुने हाड असे बोलतात त्याचप्रमाणे आजींनी उपचाराला साथ दिली. अनेक रूग्ण कोरोनाला घाबरुन जातात पण 90 वय पार केलेल्या आजी ने प्रबळ इच्छाशक्ती जोरावर कोरोनावर मात केली खरोखरच कौतुकच करावे तेव्हढे कमी !






Be First to Comment