Press "Enter" to skip to content

रायगडात करोनाचा हाहाकार : रुग्णसंख्या सहा हजारपार


ग्रामीण व शहरी भागाला करोनाचा घट्ट विळखा #

रायगडची धडधडी वाढली #

एका दिवसात 273 रुग्णांची वाढ #

आजवर 179 नागरिकांचा करोनाने घेतला बळी #

कोरोनामुळे रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद

3 हजार 498 रुग्णांनी केली करोनावर यशस्वी मात ###
 
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे .(धम्मशिल सावंत) ###

रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश हाहाकार माजविला आहे. शहरी व ग्रामीण भागात करोना रुग्णांचा चढता आलेख पाहता करोनाच्या तावडीतून कुणी सुटेल का याबाबत  शक्यता फार कमी वाटते. आजघडीला जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 107 झाल्याने जिल्ह्याची धडधडी वाढली आहे. अशातच कोरोना रुग्ण आढळून आलेली क्षेत्र कोरोना बाधित घोषित केल्याने नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती  कोरोना ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 6 हजार पार झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजवर 179 नागरिकांचा कोरोनाने बळी  घेतला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आज इथं भेटला तिथं भेटला म्हणत सर्वत्र कोरोनाची दहशत व चिंता कमालीची वाढत आहे. साधा सर्दी खोकला झाला तरी अनेकांची घाबरगुंडी होतेय. काहींनी तर घरच्या घरी उपचारावर जोर दिलाय, अनेकांनी घरगुती काढा घेण्यावर भर दिला आहे.  अशातच दिलासादायक बाब म्हणजे स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 3 हजार 498 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज नव्याने 273 करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसात 273 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1163, पनवेल ग्रामीण-357, उरण-134, खालापूर-158, कर्जत-69, पेण-141, अलिबाग-134, मुरुड-24, माणगाव-52, तळा-2, रोहा-93, सुधागड-1, श्रीवर्धन-36, म्हसळा-22, महाड-42, पोलादपूर-2 अशी एकूण 2 हजार 430 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 914, पनवेल ग्रामीण-618, उरण-247, खालापूर-29, कर्जत-120, पेण-97, अलिबाग-107, मुरुड-22, माणगाव-87, तळा-14, रोहा-116, सुधागड-6, श्रीवर्धन-19, म्हसळा-32, महाड-39, पोलादपूर-31 अशी एकूण 3 हजार 498 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-117, पनवेल ग्रामीण-33, पेण-2, अलिबाग-3, माणगाव-8, रोहा-26, सुधागड-1, पोलादपूर-1 असे एकूण 191 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-88, पनवेल ग्रामीण-22, उरण-9, खालापूर-9, कर्जत-7, पेण-8, अलिबाग-8, मुरुड-5, माणगाव-2, तळा-2, रोहा-2, श्रीवर्धन-3, म्हसळा-4, महाड-8, पोलादपूर-2 असे एकूण 179 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-93, पनवेल (ग्रा)-31, उरण-22, खालापूर-24, कर्जत-25, पेण-38, अलिबाग-7, मुरुड-1, माणगाव-10, तळा-1, रोहा-9, श्रीवर्धन-2, महाड-9, पोलादपूर-1 अशा प्रकारे एकूण 273 ने वाढ झाली आहे.
एका दिवसात 8 व्यक्तींची (पनवेल मनपा-3, उरण-1, खालापूर-2, पेण-2) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 22 हजार 266 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 298 आहे.
कोरोना बाधित रुग्ण सापडलेली गावे, शहरे,सोसायटी मध्ये कोरोना बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.  नागरिकांनी काळजी घ्या, घरात च रहा ,शासन नियमांचे पालन करा, कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करा अस आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.