सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आज सर्वाधिक कमी म्हणजे फक्त २ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह ११६५, उपचार करून बरे झालेले ९२०, उपचार घेणारे १९४, मयत ५१ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज करंजा १ व मोरा १ असे फक्त २ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. उरण ३, जेएनपीटी ३, फुंडे २, बोकडविरा २, कोप्रोली १, जासई १, करंजा १ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर मोरा येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज सापडलेल्या पॉझिटीव्हचा आकडा आजपर्यंतचा सर्वाधिक कमी म्हणजे फक्त २ असल्याने उरणकरांसाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. तर मयताचा आकडा आज आणखी १ नी वाढत तो ५१ पर्यंत पोहचला आहे. परंतु आजचा पॉझिटीव्हचा आलेला कमी आकडा यावर विश्वास ठेवून बेसावध न रहाता काही दिवसांवर गणरायाचे आगमन होणार आहे. याचे भान गणेशभक्तांनी ठेवावे.






Be First to Comment