सिटी बेल लाइव्ह/ खालापूर (मनोज कळमकर)
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत खालापूर कर्मचा-यानी सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले होते.
सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे, शंभर टक्के वेतन शासनाच्या कोषागार कार्यालयातून देण्यात यावे, नगर परिषद पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, अभियंता अग्निशमन दल लेखा व अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवांच्या निवड श्रेणी लागू करणे, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आराखडा तयार करणे, सफाई कर्मचार्यांना मोफत घर बांधून देणे, स्वच्छता निरीक्षकांचा संवर्ग तयार करणे, 2005 च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कोवीड मूळे मयत झालेल्या कर्मचा-यांना 50 लाखाच्या विम्याचा मोबदला त्वरित देणे.
अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष त्रिंबक देशमुख , गोविंद भिसे यांच्यासह इतर कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. इतर सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होते.







Be First to Comment