आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी)
पनवेल तालुक्यातील पनवेल एनएच ४ महामार्ग ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील पनवेल एनएच ४ महामार्ग ते शिवकर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या परिसरातील गामस्थांनी अनेक वेळा माझ्याकडे सदर रस्ता तातडीने करण्याबाबत वारंवार मागणी केली होती. या रस्त्याकरीता माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पनवेल एनएच ४ हायवे ते शिवकर रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत करण्यासाठी मंजूरी दिली होती. सदर मंजूरी मिळालेल्या पनवेल एनएच ४ हायवे ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व कॉक्रीटीकरण करण्याच्या कामाच्या निवीदा मागवण्यात येऊन बराच कालावधी होऊनसुद्धा अद्यापपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. सधस्थितीत रस्याची झालेली दयनीय अवस्था पाहता तातडीने कामाला सुरुवात होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी सदर पनवेल एनएच ४ हायवे ते शिवकर रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण या कामाचे कार्यादेश काढून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आपणामार्फत तातडीने आदेश व्हावेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.






Be First to Comment