हिंदुत्ववादी कार्यकर्ते पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण #
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे 22 मार्च 2020 पासून देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले.नागरिकांना घरातल्या घरात मनोरंजनासाठी टीव्ही, कॉम्पुटर, लॅपटॉप, मोबाईल आदी वस्तूंचा वापर करावे लागत आहे.पर्यायाने विजेची मागणी वाढली. मात्र अधून मधून वीज गायब होत असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.आताही अधून मधून वीज गायब होत आहे त्यामुळे जनता हैराण होत आहे. आता मात्र गणेशोत्सव जवळ आले आहेत त्यामुळे हिंदूंच्या या पवित्र सणात गणेशोत्सवादरम्यान दहा दिवसाच्या कालावधी मध्ये महावितरण कंपनीने अंखडित वीज सेवा देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतून होत असल्याने त्या अनुषंगाने गणेशोत्सव दरम्यान वीज घालवू नये.जनतेला विजेचा सुरळीत वीज पुरवठा करावा, जी काही उरलेली किंवा पेंडिंग कामे आहेत ती गणेशेत्सवापूर्वी करून घ्यावीत. अशी मागणी उरण मधील पत्रकार, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तथा विश्व हिंदू परिषदेचे सदस्य विठ्ठल ममताबादे यांनी महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याकडे केली आहे.
महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे व प्रामाणिकतेमुळे जनतेला आज घरात सुखाने झोप घेता येत आहे.निसर्गाचे चक्रीवादळ तसेच जोराचा पाऊस यामुळे उरण मध्ये अनेक झाडे, विजेचे खांबे तुटली होती. त्यामुळे उरण मध्ये 1-2 दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र गणेशोत्सव दरम्यान योग्य ती खबरदारी घेऊन, योग्य ते नियोजन करून गणेशोत्सव दरम्यान वीजपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, वीज खंडित करू नये अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याकडे इमेलद्वारे पत्रव्यवहार करून केली आहे.






Be First to Comment