भारतीय बौद्ध महासभा व वंचित कडून करण्यात आली मदत
सिटी बेल लाइव्ह / (राजेश कांबळे)
मागिल महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळमुळे फार मोठे नुकसान झाले यामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त सुध्दा झाले असल्याने त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीरताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने आज पेण तालुक्यासह रामवाडी येथील हुतात्मा चौकात गरीब गरजूंना चटई, ब्लॅंकेट, टाॅवेल, बेडशीट, चादर अशा वस्तूंचे वाटप भारतीय बौद्ध महासभा पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, सरचिटणीस सचिन कांबळे, हरिश्चंद्र गायकवाड, पर्यटन विभाग उपाध्यक्ष सतोष आडसुल, भगवान शिंदे, विनोद बनसोडे, मधूकर गायकवाड, महिला आघाडीच्या रश्मी जाधव, सविता सुर्वे, सचिन सोनावणे, नरेश सताणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना चंद्रकांत सोनावणे म्हणाले की कोरोनाच्या या महामारीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे यावर आपला देश लवकरच मात करणार आहे परंतु नैसर्गिकरीत्या आलेल्या आपत्तीमुळे सदर मदत आपल्यासाठी आंबेडकरांच्या घरातून आलेली आहे त्यामुळे तीचे मोल अनमोल आहे असे त्यांनी सांगितले.






Be First to Comment