सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
कोरोनाच्या महाभयंकर संकटातही कोरोनोबाबततचे सर्व नियमांचे पालन करित नागोठणे जवळील सु. ए. सो. चे माध्यमिक विद्यालय वांगणी हायस्कुलमध्ये भारताचा ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माध्यमिक विद्यालय वांगणी हायस्कुलचे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या हस्ते सकाळी ७.३० वा. ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोनोबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकर ठमके यांच्यासह मुख्याध्यापक एल. एल. ठाकरे, शिक्षक टिळक खाडे, विकास म्हात्रे, नरेंद्र पाटील, बबन सुतार, भद्रीशेट्टे मँडम, कर्मचारी संदिप भोसले, रविंद्र भोसले आदि उपस्थित होते.






Be First to Comment