सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)-
बद्री केदार चॅरीटेबलं ट्रस्टचे अध्यक्ष आणि कळंबोली भाजपा मंडळ उपाध्यक्ष दिलीप बिष्ट यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्यात सैनिटीझर आणि मास्कचे वाटप केले.
यावेळी कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतीश गायकवाड उपस्थितीत होते. दिलीप बिष्ट यांनी सांगितले की कोरोनाचा संकटा मध्ये पोलीस दल फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. यासाठी त्यांना छोटीशी मदत व कर्तव्य म्हणून सैनिटीझर आणि मास्क चा वाटप केले. या वेळी स्री शक्ती फाऊंडेशन संस्थापक साै.विजया चंद्रकांत कदम, कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत आणि उमेश गायकवाड उपस्थित होते.






Be First to Comment