सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी विजवितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाकडून नागोठण्यात व परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वीजदुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी नागोठणे शहरातील विद्युत खांब उभारण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे नागोठणे शहरातील विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद करण्यात येणार असल्याचे विजवितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विज वितरण कंपनीचे नागोठण्यातील कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी केले आहे.






Be First to Comment