सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पाहणी केली तसेच संबंधित यंत्रणेच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांना अपूर्ण असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, कृषी व पशु संवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.जयश्री काफरे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी, कार्यकारी अभियंता श्री.कोळी, गटविकास अधिकारी श्री.प्रभे, म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री. उकिरडे, श्री.समीर बनकर, श्री.नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.







Be First to Comment