सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन नागोठण्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करण्यात आला. नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजिप सदस्य किशोर जैन, उपसरपंच सुरेश जैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रा.पं.सदस्य व नागरिक यावेळी उपस्थित होते. कोरोना काळात नागोठण्यात सर्वोकृष्ट सेवा बजावणारे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे, डाॅ. स्नेहल कोळी, नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सफाई कामगार आदिंचा यावेळी राजिपचे सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याशिवाय येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे संकुलात स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक उल्हास ठाकूर, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. वेलशेत येथील भाएसो शैक्षणिक संकुलात संस्थेचे अध्यक्ष किशोर जैन यांच्या हस्ते तर होली एंजल स्कूल मध्ये मुख्याध्यापक विजय मुल्कवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नागोठण्यातील व विभागातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, माध्यमिक विद्यालये, सहकारी संस्था, वनकार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सहकारी पतसंस्था, नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी तसेच आजूबाजूच्या सर्व शाळांमध्ये कोरोनाच्या काळातील शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत हे ध्वजारोहण करण्यात आले.






Be First to Comment